आज शनिवार, २६ मार्च २०११. आज रात्री ८.३० ते ९.३० Earth Hour साजरा करण्याचं ठरवलं.(मी 'गो ग्रीन' बद्दल जरा जास्तच जागरूक आहे ना(असे माझे फ्रेंड्स मला चिडवतात.))
खरं तर इलेक्ट्रिसिटी बोर्डनेच लाईट कट करायला हवी सगळ्या बेंगलोरमध्ये. पण नाही ना!!
Earth Hour म्हणजे स्वत:च्या मर्जीने, स्वत:च्या घरातली लाईट off करायची.
मग म्हटले करून पाहूया किती वेळ जमतंय ते..
एक तर माझी रुममेट सकाळीच जे बाहेर गेली, ते ८.३० झाले तरी आली नव्हती.(तिचा काही दोष नाही म्हणा.. इथे १ काम असो वा १०, अख्खा दिवस जाणार बाहेर पडलं कि..)
मग एकटीच आपली बसले होते.. ८.३० रूममधली लाईट Off केली, पंख बंद केला, PC बंद केला. लिविंगरूमचा अन बाल्कनीचा दरवाजा उघडला..तेवढीच हवा खेळती राहील रुममध्ये..!!
(हवेसोबत डास आणि मधमाश्या सुद्धा आल्या, ती वेगळी गोष्ट..)
मग सगळं काही आहे तसंच राहू दिलं अन गेले गच्चीवर..
मस्त हवा सुटली होती अन वातावरण आल्हाददायक होते.. मस्त वाटले एकदम.
खाली जिकडे नजर जाईल तिकडे लाईटच लाईट.. Earth Hour बद्दल कोणीच जागरूक नव्हते.(जे जागरूक होते, ते तरी काय करणार होते म्हणा!! रस्त्यावरचे लाईट बंद करू शकत नाहीत, ऑफिसमध्येही जमण्यासारखे नाही.. आणि घरात लाईट बंद केला तर घरातच बसावे लागेल, नाहीतर चोर घुसण्याची शक्यता आहे.. etc..)
मग थोडा स्वत:बद्दल विचार केला, स्वत:ला 'गो ग्रीन' म्हणवणारे आपण किती anti-green आहोत!! कधी पाणी जास्त सांडतो, कधी ताटात अन्न उरतं, ते टाकून देतो(मी तर रोज टाकते.. मला मोजून खायची सवय नाही अन मला किती हवंय ते खाण्यापूर्वी समजत नाही..)
मग कळले, दुसऱ्यांना 'गो ग्रीन' म्हणण्याआधी स्वत: किती जागरूक आहोत ते पाहण्याची गरज आहे..
दुसऱ्यांचा विचार करत असताना आपल्यातल्या उणीवा, दोष जाणून घेणं आवश्यक आहे हे कळलं..
या वर्षी Earth Hour ने मला बरंच काही शिकवलं.. अन तुम्हाला???